महाराष्ट्र शासनाने सुरु केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना हि राज्यातील महिलांसाठी अत्यंत महत्वाची अशी हि योजना आहे. या योजनेमधून पात्र लाभार्थी महिलांना दर महिन्याला एक हजार पाचशे रुपये म्हणजेच दीड हजार रुपये दिले जातात. सदर योजनेसाठी अनेक महिलांनी अर्ज केलेले आहेत, परंतु काही महिलांना आपला अर्ज मंजूर झाला आहे कि नाही? हेच माहिती नाही. अर्ज नामंजूर झाला असेल तर त्यांना योजनेचा लाभ मिळत नाही. तर काही महिलांचे आधार कार्ड बँक मध्ये लिंक नाही अशा महिलांना देखील योजनेचा लाभ मिळत नाही.
लाडकी बहिण योजनेचे स्टेटस का चेक करावे?
- लाभार्थीचा अर्ज मंजूर झाला आहे कि नाही हे समजते.
- सदरील योजनेचा अर्ज नामंजूर झाला असेल तर कारण समजते.
- योजनेचे पैसे का मिळत नाही याची माहिती मिळते.
- लाभार्थीची रक्कम कोणत्या बँक खात्यात जमा झाली आहे हे समजते.
- लाभार्थीला एकूण किती हप्ते मिळाले याची सविस्तर माहिती मिळते.
परंतु लाडकी बहिण योजनेचे स्टेटस कुठे आणि कसे चेक करायचे? अनेकांना माहिती नसल्यामुळे लाभार्थी अर्जाचे स्टेटस पाहता येत नाही, या लेखात लाडकी बहिण योजना अर्जाचे स्टेटस कसे पहायचे याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे.
लाडकी बहिण योजनेचे स्टेटस कसे पाहायचे?
सर्व प्रथम आपण ऑनलाईन सेवा केंद्र/आपले सरकार सेवा केंद्र इ. ठिकाणी आपला अर्ज भरला असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी जावूनच अर्जाचे स्टेटस चेक करता येईल मोबाईल वरती पाहता येणार नाही. परंतु ज्या लाभार्थींनी लाडकी बहिण योजनेच्या वेबसाईट वरती स्वतः अर्ज केला आहे, त्यांना मोबाईल वरून स्टेटस पाहता येईल. तसेच ज्या महिलांनी नारीशक्तीदूत अँपवरून अर्ज भरला आहे अशा महिलांना अँपवरून स्टेटस चेक करता येते.
जर तुम्ही लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज केला असेल, तर तुमचा अर्ज मंजूर झाला आहे कि नाही हे जाणून घेण्यासाठी खालील स्टेप फॉलो करून आपल्या अर्जाचे स्टेटस पाहू शकता.
- सर्व प्रथम लाडकी बहिण योजनेची अधिकृत वेबसाईट ओपन करा.
- योजनेची अधिकृत वेबसाईट : https://ladakibahin.maharashtra.gov.in/
- वेबसाईट उघडल्या नंतर अर्जदार लॉगीन पर्यायावर क्लिक करा.
- आपण अर्ज भरताना वेबसाईट वरती ज्या मोबाईल नंबर ने रजिस्ट्रेशन/नोंदणी केली होती तो मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगीन करा.
- पासवर्ड विसरला तर Forgot Password? Click Here पर्यायावर क्लिक करून नवीन पासवर्ड तयार करा.
- लॉगीन झाल्यानंतर Menu वरती क्लिक करा त्यामध्ये Application Made Earlier वरती क्लिक करा.

- आपण भरलेल्या अर्जाची यादी त्याठिकाणी पाहायला मिळेल.

- वरील फोटो मध्ये दाखवल्याप्रमाणे ज्या अर्जाचे तुम्हाला स्टेटस पहायचे आहे त्यासमोरील Action बटन वरती क्लिक करा. (वरील फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे)
- निवडलेल्या लाभार्थीच्या खात्यात किती पैसे जमा झाले व कोणत्या बँकेत कधी जमा झाले याची संपूर्ण माहिती पाहायला मिळेल.
अशा प्रकारे आपण मोबाईल वरून स्टेटस पाहू शकता, आपण जर ऑनलाईन सेवा केंद्र याठिकाणी अर्ज केला असेल तर त्या ठिकाणी जावून अर्जाचे स्टेटस पहाता येईल. कारण स्टेटस चेक करण्यासाठी आपण ज्या लॉगीन आयडी वरून अर्ज भरला आहे त्याच आयडी वरून स्टेटस पाहता येते.



Ladki bahin yojana