महाराष्ट्र शासनाने राज्यातील महिलांसाठी एक महत्वाची योजना सुरु केली आहे ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना. १ जुलै २०२४ पासून अर्ज ऑनलाईन अर्ज भरणे सुरु झाले होते. या योजने अंतर्गत पात्र असणाऱ्या महिलेला दर महिन्याला थेट बँक खात्यात १५००/- रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. हि योजना महिलांच्या हातात थोडाफार आर्थिक आधार निर्माण करून त्यांना स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न आहे. 

ladakibahin.maharashtra.gov.in - मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना काय आहे?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना महाराष्ट्र राज्य शासनाने २०२४ मध्ये सुरु केली. योजनेमध्ये पात्र लाभार्थी महिलेला प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये दिले जातात. राज्यातील २१ ते ६५ वर्ष या वयोगटातील विवाहित महिला, परित्यक्त्या आणि निराधार महिला घटस्फोटीत महिला, विधवा महिला इ. महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळतो. तसेच त्या कुटुंबातील १ (एका अविवाहित) मुलीला या योजनेचा लाभ दिला जातो.

यासाठी लाभार्थी महिलांनी योजनेच्या अधिकृत पोर्टल https://ladakibahin.maharashtra.gov.in वेबसाईट वरती, किंवा अंगणवाडी सेविका यांच्याकडे ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करणे गरजेचे आहे. आता अर्ज करणे बंद आहे, परंतु शासनाने आता लाभार्थी महिलांना ई-केवायसी करण्यास सांगितले आहे. यामुळे प्रत्येक लाभार्थी महिलेने ई-केवायसी करणे गरजेचे आहे. अन्यथा लाडकी बहिण योजनेचा लाभ दिला जाणार नाही. पात्र लाभार्थींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे १५०० रुपये हे त्यांच्या आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये DBT मार्फत जमा केले जातात.

लाडकी बहिण योजना ladakibahin.maharashtra.gov.in वेबसाईट बद्दल माहिती

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनाचे अर्ज स्वीकारण्यासाठी ladakibahin.maharashtra.gov.in/  हे पोर्टल सुरु केले आहे. अनेक लाभार्थी अर्ज करण्यासाठी ladkibahin.maharashtra.gov.in या वेबसाईट वरती अर्ज करण्याचा प्रयत्न करीत आहेत परंतु अर्जदाराने शासनाच्या अधिकृत पोर्टल वरतीच अर्ज भरावा. त्याचबरोबर अर्ज करण्यासाठी नारीशक्ती दूत या अँप द्वारेसुद्धा अर्ज करता येतो.

Ladki Bahin Yojana Highlights

योजनेचे नाव मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना
योजनेचा विस्तार
महाराष्ट्र राज्य
योजना सुरु कोणी केली?
महाराष्ट्र राज्य शासनाने
लाभार्थी
महिला (योजनेच्या अटी व पात्रतेनुसार)
लाडकी बहिण योजना अधिकृत वेबसाईट
लाडकी बहिण योजना केवायसी लिंक
अर्ज सुरु दिनांक
1 जुलै 2025
अर्ज करण्याची प्रक्रिया
ऑनलाईन
अर्ज कुठे करावा
https://ladakibahin.maharashtra.gov.in/ वेबसाईट वरती अर्ज करता येईल.

Ladki Bahin Yojana Eligibility Criteria मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना पात्रता

  • अर्जदाराचे वय हे २१ वर्ष पूर्ण ते ६५ दरम्यान असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार महिला हि महाराष्ट्राची रहिवाशी असणे आवश्यक आहे.
  • महाराष्ट्र राज्यतील विवाहित, विधवा, निराधार महिला, परित्यक्त्या आणि घटस्फोटीत महिला
  • लाभार्थीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे २ लाख ५० हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे.

ladki bahin.maharashtra.gov.in kyc - लाडकी बहिण योजना KYC

लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी साठी शासनाने आता ई-केवायसी करणे बंधनकारक केले आहे. कारण शासनाच्या असे निदर्शनास आले आहे की, काही महिला लाडकी बहिण योजनेचा लाभ घेण्यास पात्र नसून देखील योजनेचा लाभ घेत आहेत. यामुळे शासनाने प्रत्येक लाभार्थी महिलेला ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. ई-केवायसी करण्यासाठी शासनाने https://ladakibahin.maharashtra.gov.in/ekyc/ हि लिंक उपलब्ध करून दिली आहे.

केवायसी करण्यासाठी लाभार्थीकडे स्वतःचे आधार कार्ड आणि विवाहित असेल तर पतीचे आधार कार्ड अविवाहित असेल तर वडिलांचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आधार कार्डला आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे बंधनकारक आहे. लाभार्थी मोबाईल वरून किंवा ऑनलाईन सेवा केंद्रावर जाऊन केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकतात.

ladki bahin.maharashtra.gov.in - लाडकी बहिण योजना अर्ज आवश्यक कागदपत्रे

लाडकी बहिण योजनेचा अर्ज करण्यासाठी आपल्याकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • बँक पासबुक (आधार कार्ड बँक खात्याला लिंक असणे आवश्यक)
  • अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो
  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे २.५० लाख पेक्षा जास्त नसावे यासाठी उत्पन्न दाखला किंवा रेशन कार्ड
  • लाडकी बहिण योजना हमीपत्र
  • अधिवास प्रमाणपत्र ( अधिवास प्रमाणपत्र नसल्यास १५ वर्षापूर्वीचे १) रेशन कार्ड २) मतदार ओळखपत्र 3) शाळा सोडल्याचा दाखला ४) जन्म दाखला यापैकी कोणतेही एक)
  • मोबाईल नंबर

लाडकी बहिण योजना KYC अंतिम मुदत

शासनाने लाडकी बहिण योजनेची ई-KYC करण्यासाठी 18 नोव्हेंबर 2025 हि मुदत दिली होती. परंतु नैसर्गिक आपत्ती तसेच तांत्रिक अडचणी आणि जास्त संखेने ई-KYC प्रलंबित असलेल्या लाभार्थी महिला यामुळे शासनाने ई-KYC करण्याची मुदत वाढवून 31 डिसेंबर 2025 केली आहे. यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.

ज्या लाभार्थी महिलांनी अजून पर्यंत आपली ई-KYC केली नसेल तर आजच आपली केवायसी पूर्ण करा, KYC करण्याची अंतिम मुदत हि 31 डिसेंबर 2025 आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना KYC नवीन अपडेट

लाडकी बहिण योजनेची ज्या महिलांनी KYC केली आहे, परंतु त्यांच्याकडून केवायसी करताना काही चूक झाली असेल किंवा चुकीचा पर्याय निवडला असेल अशा महिलांसाठी केवायसी दुरुस्त करण्यासाठी पर्याय देण्यात आला आहे. हा पर्याय फक्त ज्या महिलांनी केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडला असेल त्याच महिलांसाठी असणार आहे.

Scroll to Top