Ladki Bahin eKYC Correction : लाडकी बहिण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी आनंदाची बातमी, कारण ज्या महिलांनी केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडला असेल अशा महिलांसाठी केवायसी करण्यासाठी पुन्हा पर्याय उपलब्ध करण्यात आलेला आहे.
Ladki Bahin Yojana Maharashtra
राज्य शासनाच्या लाडकी बहिण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना आर्थिक लाभ दिला जातो. योजनेमध्ये अनेक अपात्र लाभार्थी महिलांनी देखील योजनेचा लाभ घेत आहेत हे शासनाच्या निदर्शनास आले होते. यामुळे शासनाने योजनेच्या प्रत्येक लाभार्थीने केवायसी करणे बंधनकारक केले होते. यामुळे योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांनी eKYC प्रक्रिया पूर्ण केली. परंतु अनेक महिलांकडून केवायसी करताना चुकीच पर्याय निवडला गेला. यामुळे त्या महिलांना मिळणारा लाडकी बहिण योजनेचा लाभ बंद झाला.
हि बाब शासनाच्या निदर्शनास आली यामुळे, शासनाने लाडकी बहिण योजनेची केवायसी ज्या महिलांकडून चुकीचा पर्याय निवडला गेला आहे आणि हप्ता बंद झाला आहे अशा महिलांना केवायसी करण्यासाठी पुन्हा पर्याय उपलब्ध करून दिला आहे, आता हि केवायसी फक्त त्याच महिलांना करता येणार, ज्यांच्या कडून केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडला असेल.
Ladki Bahin KYC Correction
जर लाडकी बहिण योजनेची केवायसी चुकीची झाली असेल तर हि त्या लाभार्थ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. शासनाने KYC लिंक पुन्हा सुरु केली आहे. आजच आपली KYC चेक करा आणि जर आपल्याकडून चुकीचा पर्याय निवडला असेल आणि हप्ता बंद झाला असेल तर आजच आपली केवायसी करून घ्या.
लाडकी बहिण योजना KYC दुरुस्त कशी करावी?
- केवायसी दुरुस्त करण्यासाठी शासनाच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
- लाडकी बहिण योजना अधिकृत वेबसाईट : https://ladakibahin.maharashtra.gov.in/
- अधिकृत वेबसाईट ओपन करा, वेबसाईट ओपन केल्यानंतर खालील प्रमाणे पर्याय पाहायला मिळेल. हि eKYC संधी फक्त त्या लाभार्थ्यांना आहे ज्यांच्याकडून eKYC करताना चुकीचे पर्याय निवडण्यात आले होते, यावरती क्लिक करा.
- आपल्या समोर केवायसी पेज ओपन होईल. त्या ठिकाणी लाभार्थीचा आधार क्रमांक विचारला जाईल आधार नंबर टाकून पुढील प्रक्रिया पूर्ण करा.
- केवायसी केल्यानंतर आपली केवायसी झाली आहे का, चेक करा.



