लाडकी बहिण योजना eKYC दुरुस्ती मुदतवाढ 2026 : Ladki Bahin Yojana eKYC Date Extended

Ladki Bahin Yojana eKYC Date Extended

महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी सुरु करण्यात आलेली लाडकी बहिण योजना हि एक महत्वाची शासकीय योजना आहे. या योजने अंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना आर्थिक सहाय्य दिले जाते. मात्र, अनेक लाभार्थी महिलांची केवायसी (KYC) करताना चुकीचा पर्याय निवडल्यामुळे त्यांना योजनेचा मिळणारा आर्थिक लाभ म्हणजेच 1500 रुपये मिळालेले नाहीत. याच पार्श्वभूमीवर शासनाने KYC दुरुस्ती करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे.

KYC दुरुस्तीची नवीन अंतिम तारीख

शासनाने जाहीर केल्यानुसार, लाडकी बहिण योजना KYC दुरुस्ती करण्याची अंतिम तारीख वाढवण्यात आली आहे. त्यामुळे ज्या महिलांची KYC करताना काही चूक झाली असेल म्हणजेच चुकीचा पर्याय निवडला असेल लाभार्थींना पुन्हा केवायसी करता येणार आहे आणि यामुळे त्यांना अतिरिक्त वेळ मिळाला आहे. हि संधी वाया जाऊ न देता लवकरात लवकर KYC करणे गरजेचे आहे.

KYC करण्यासाठी शासनाने 31 मार्च 2026 हि मुदत दिली होते परंतु आता शासनाकडून यामध्ये वाढ करण्यात आली असून लाभार्थींना ३० एप्रिल 2026 हि अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे.

KYC दुरुस्ती का महत्वाची आहे?

लाभार्थीकडून KYC करताना चुकीचा पर्याय निवडला असेल तर पुन्हा केवायसी करणे आवश्यक आहे कारण चुकीचा पर्याय निवडल्यामुळे अनेक लाभार्थी महिलांचे पैसे मिळणे बंद झाले होते. यामुळे पुन्हा केवायसी करणे गरजेचे आहे.

केवायसी दुरुती कशी करायची ?

लाडकी बहिण योजनेची KYC दुरुस्ती करण्यासाठी खालील पद्धत वापरू शकता.

  • अधिकृत वेबसाईटला भेट द्या. वेबसाईट – https://ladakibahin.maharashtra.gov.in/ekyc
  • आधार क्रमांक टाका नंतर CAPTCHA कोड भरा.
  • मी सहमत आहे समोर क्लिक करा.
  • ओटीपी पाठवा बटन वरती क्लिक करा.
  • आधार कार्ड लिंक असलेल्या मोबाईल नंबर वरती सहा अंकी ओटीपी येईल तो ओटीपी टाका.
  • ओटीपी टाकून सबमिट करा.
  • पुढे तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील, त्या प्रश्नांचे योग्य उत्तर निवडा.
  • उपरोक्त अ.क्र. A व B मध्ये देण्यात आलेली ….. समोरील चौकोनात क्लिक करून सबमिट करा.

अशा प्रकारे आपण केवायसी दुरुस्त करू शकता.

KYC करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • आधार कार्ड मोबाईल नंबर
  1. केवायसी करताना सर्व माहिती अचूक भरा.
  2. चुकीचा पर्याय निवडल्यास योजनेचा लाभ मिळणे बंध होऊ शकतो.
  3. केवायसी करताना शासनाच्या अधिकृत वेबसाईट वरतीच KYC करावी.
  4. शेवटच्या तारखेची वाट न पाहता लवकर केवायसी करून घ्यावी.

लाडकी बहिण योजना KYC दुरुस्तीची मुदतवाढ हि लाभार्थ्यांसाठी मोठी संधी आहे. अजूनही ज्यांनी KYC दुरुस्ती केली नाही त्यांनी तत्काळ प्रक्रिया पूर्ण करावी. योग्य माहिती भरून केवायसी केल्यास कोणत्याही अडचणी शिवाय मिळू शकतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top