महाराष्ट्र शासनाने राबविलेल्या लाडकी बहिण योजना (Ladki Bahin Yojana) अंतर्गत पात्र लाभार्थी महिलाना दरमहा आर्थिक मदत म्हणजेच 1500 रुपये दिले जातात. या योजनेचा लाभ अखंडपणे मिळावा यासाठी ई-KYC प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे.
याआधी शासनाने 18 नोव्हेंबर 2025 हि अंतिम तारीख दिली होती. परंतु नैसर्गिक आपत्ती, तांत्रिक अडचणी तसेच अनेक महिलांची ई-केवायसी प्रलंबित असल्यामुळे आता ई-KYC ची अंतिम मुदत वाढविण्यात आली आहे.
लाडकी बहिण योजना KYC करण्याची अंतिम मुदत किती?
शासनाने केलेल्या नवीन सुधारणेनुसार लाडकी बहिण योजना KYC ची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2025 करण्यात आली आहे. ज्यांनी अजूनही आपली ई-KYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांनी आजच आपली ई-KYC करून घेणे गरजेचे आहे. कारण केवायसी केल्यानंतरच लाभार्थी महिलेला लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळू शकतो.
ई-केवायसी करणे का आवश्यक आहे?
- लाभार्थीचे नाव तसेच ओळख सत्यापित करण्यासाठी केवायसी करणे आवश्यक आहे.
- मिळणारा लाभ DBT मार्फत लाभार्थीच्या बँक खात्यात जमा होण्यासाठी.
- पात्र लाभार्थीला योजनेचा लाभ मिळण्यासाठी.
- भविष्यात मिळणारे सर्व हप्ते वेळेवर मिळवण्यासाठी.
लाडकी बहिण योजना ई-KYC करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- लाभार्थी महिलेचे आधार कार्ड
- आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर
- लाभार्थी महिला अविवाहित असेल तर वडिलांचे आधार कार्ड
- लाभार्थी महिला विवाहित असेल तर पतीचे आधार कार्ड
ई-KYC कुठे करावी?
लाडकी बहिण योजनेची केवायसी https://ladakibahin.maharashtra.gov.in/ekyc या वेबसाईटवरती मोबाईल वरून करू शकता. मोबाईल वरून केवायसी करणे शक्य नसल्यास जवळच्या ऑनलाईन सुविधा केंद्रावर जावून ई-केवायसी करू शकता.
अजून पर्यंत आपण लाडकी बहिण योजनेची केवायसी केली नसेल तरच आजच आपली लाडकी बहिण योजनेची केवायसी करून घ्यावी. कारण आपण जर केवायसी केली नाही तर लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळणार नाही. तसेच पुढील मिळणारा हप्ता देखील बंद होऊ शकतो. त्यामुळे वाढलेली अंतिम तारीख लक्षात घेऊन त्वरित प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे.


